पाटण: कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढल्याने रविवारी दुपारी चार वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांनी वर उचलून त्यातून 10 हजार व पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 12,100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडले आहे.
त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणात सध्या 94.09 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 11.16 टीएमसी पाण्याची गरज आहे. शनिवार संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच या वेळेत धरणात 3.02 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. या चोवीस तासांसह एक जूनपासून पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे: कोयना 92 (3393) मिलिमीटर, नवजा 179 (4039)मिलिमीटर, महाबळेश्वर 100 (3970) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.