रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या ५८ व्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी २१ ऑगस्टला भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात होणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे एकूण १२ विभाग असून त्यातील दक्षिण रत्नागिरी या दहाव्या झोनमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. दक्षिण रत्नागिरीतील २० महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. लोकनृत्य, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व अशा ४२ कलाप्रकारांचे कलाकार विद्यार्थी सादरीकरण करतील. अंतिम फेरी ८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणार आहे.विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्र. प्राचार्या मधुरा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड यांनी दिली. या महोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. आनंद आंबेकर आणि दक्षिण विभाग सहसमन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे मार्गदर्शन करत आहेत.
रत्नागिरी : डीजीके महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचा ५८ वा युवा महोत्सव
