GRAMIN SEARCH BANNER

भारतीय जनता पार्टीच्यावतीने सेवा पंधरवडा साजरा करताना विविध समाजोपयोगी उपक्रम

Gramin Varta
124 Views

सचिन यादव/ धामणी

भारताचे  पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे देशभरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम,आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, सार्वजनिक स्वच्छता अभियान, शासनाच्या विविध सेवा,विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विविध योजनांचा लाभ लोकांना मिळवून देणे असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे यांच्या संकल्पनेतून धामणी येथील त्यांच्या कार्यालयामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांची नोंदणी, विविध दाखल्यांचे वितरण करण्याचे काम गेली दोन दिवस धामणी बुथ अध्यक्ष योगेश जोगळे,रोशन पाष्टे,स्वप्नील पाटेकर,शरद यादव,विलास मेस्त्री,जयंत आमकर,अनंत दुदम,संदेश विंजले, मंगेश जुवळे करत आहेत.
   
   उपक्रम वर्षभर चालू ठेवावा
    
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे त्यामुळे सर्व शासकीय योजनांचा लाभ काय आहे आणि तो कसा मिळेल याची परिपूर्ण माहिती सरचिटणीस डॉ अमित ताठरे यांच्यावतीने ती आमच्यापर्यंत पोहचत आहे त्यामुळे आम्ही या योजनेंचा लाभ घेत आहोत. सेवा पंधरवडा हा उपक्रम वर्षभर चालू रहावा अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

रीणा रविकांत जोगळे
  गृहीणी

Total Visitor Counter

2648476
Share This Article