GRAMIN SEARCH BANNER

…असे केल्यास तापवलेल्या पलिथ्याने चटका देईन म्हणणाऱ्या महिलेच्या डोक्यात घातला दगड, महिला जखमी

Gramin Varta
18 Views

दापोलीतील घटना

दापोली : तालुक्यातील कोळथरे गोवलेवाडी येथे दारूच्या व्यसनात असलेल्या एका व्यक्तीने जमिनीच्या वादातून एका महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला महिलेने तापवलेल्या पलिथ्याने चटका दिल्याच्या रागातून आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश अशोक गोवले (रा. कोळथरे गोवलेवाडी, ता. दापोली) हा दारूच्या नशेत सतत घरातील जागेवरून फिर्यादी धनश्री धनंजय गोवले (वय ५०) यांना शिवीगाळ करत होता. सततच्या या त्रासाला कंटाळून धनश्री यांनी रुपेशला ‘असे केल्यास तापवलेल्या पलिथ्याने चटका देईन’ असा इशारा दिला होता. तरीही ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रुपेशने पुन्हा एकदा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी, धनश्री यांनी ठरल्याप्रमाणे तापवलेल्या पलिथ्याने रुपेशच्या तोंडाला चटका दिला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रुपेशने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. यात धनश्री गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मदतीला त्यांचे पती धावून गेले असता, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला करत डोक्यात दगड मारला आणि ‘तुम्हाला बघून घेतो’ अशी धमकी दिली.

या घटनेनंतर, धनश्री गोवले यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे. गु.आर.क्र. २०/२०२५ नुसार, रुपेश गोवले यांच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८ (१), ३५२, आणि ३५१ (२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3073033
Share This Article