संगमेश्वर : तालुक्यातील फुणगुस भद्रपूर वठार येथे कपाटाखालून कोयती काढत असताना विषारी साप चावल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसंत महादेव शिंदे (वय ६५, रा. फुणगुस भद्रपूर वठार, ता. संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत महादेव शिंदे हे २५ जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरी कपाटाखालून कोयती काढत होते. त्याचवेळी त्यांना विषारी सापाने दंश केला. साप चावल्याचे लक्षात येताच, तातडीने १०८ ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यानच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वसंत शिंदे यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
संगमेश्वर : कपाटाखालून कोयती काढताना सर्पदंश, फुणगुस येथील वृद्धाचा मृत्यू

Leave a Comment