रत्नागिरी: शहरालगतच्या कर्ला मारुती मंदिराच्या परिसरात चोरीच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. रौफ इकबाल डोंगरकर (३६, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) आणि मोहफीस यासीन सोलकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हे दोघे संशयित कर्ला मंदिर परिसरात चोरीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यासह संशयास्पद परिस्थितीत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी दोन्ही संशयितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शहर पोलिसांनी केलेल्या या सतर्क कारवाईमुळे मंदिरातील संभाव्य चोरीचा प्रयत्न हाणून पाडला गेला.
रत्नागिरी : कर्ला मारुती मंदिरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक
