GRAMIN SEARCH BANNER

आता ‘चाकरमानी’ म्हणायचा नाय ; ‘कोकणवासी’ म्हणायचे

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ नाही तर ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्यात यावे, असे स्पष्ट स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहे.यासंदर्भात लवकरच शासन परिपत्रक काढण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणवासीय नागरिकांच्या काही संघटना यासंबंधित मागणी करत आहे. याच मागणीला आता अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चाकरमानी हा शब्द ‘चाकर’ म्हणजे सेवक आणि ‘मानी’ म्हणजे मानणारा यांच्या संयोगातून तयार झाला आहे. चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला होता. यावरच आता उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले असून, लवकरच याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या अनुषंगाने यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली होती.

गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील नागरिक कामाच्या, नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. परंतु सांस्कृतिक वारसा जपून ठेवणारे कोकणवासी शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असतात. यादरम्यान त्यांचा चाकरमानी म्हणून उल्लेख केला जातो.

यावरच अजित पवार म्हणाले की, ‘चाकरमानी’ हा शब्द कोकणवासीयांना कमी दर्जाचा किंवा फक्त कामगार म्हणून दाखवतो, ज्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख आणि अभिमान दाबला जातो. कोकणवासी हे फक्त चाकरमानी नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत. त्यांना योग्य संबोधन द्या आणि त्यांचा आदर करा.’

दरम्यान, अजित पवार यांनी इथून पुढे सरकारी अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना हे संबोधन टाळण्याचे आणि ‘कोकणवासी’ किंवा ‘कोकणवासीय’ असा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Total Visitor Counter

2474961
Share This Article