रत्नागिरी : जयगडहून निवळीच्या दिशेने येणाऱ्या डंपरला माचीवलेवाडी येथे आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने डंपर साईडपट्टीकडून काढताना मागील चाक गटारात गेल्याने वाहनाचा उजवा भाग पूर्णपणे गटारात कोसळला. त्यामुळे डंपरचा मागचा भाग हवेत उचलला गेला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने दरवाजा उघडून वेळीच बाहेर पडत जीव वाचवला. या डंपरमध्ये ‘कुंडा’ भरलेला होता, जो अपघातानंतर रस्त्यावर व गटारात पसरला.
या घटनेमुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. दुपारी सुमारे बारा वाजता क्रेनच्या सहाय्याने डंपर बाहेर काढण्यात आला.
जयगड-निवळी मार्गावर डंपरला अपघात; चालक सुखरूप बचावला
