GRAMIN SEARCH BANNER

ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप वितरित

Gramin Search
21 Views

रत्नागिरी: डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. या लॅपटॉप आणि प्रिंटरमुळे तलाठी, मंडळ अधिकारी ई-फेरफार प्रणाली वापर कर्ते यांना अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी सोपे होणार आहे.

Total Visitor Counter

3367001
Share This Article