मंडणगड : येथील बस स्थानकाच्या बाहेर चोरी करण्याच्या इराद्याने लपून बसलेल्या एका संशयित आरोपीला मंडणगड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या या कृतीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
ही घटना रविवार, दिनांक २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलीस नाईक सबंधदास प्रताप मावची यांना गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसले. अधिक तपास केला असता, हा व्यक्ती मंडणगड एस.टी. स्टँडच्या बाहेरील एका शेडच्या मागे लपून बसलेला होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याची ओळख गणेश चित्रुप्रसाद हरिजन (वय ३९, रा. बाणकोट रोड, मंडणगड) अशी पटली. आरोपी हा चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आपले अस्तित्व लपवत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड बस स्थानकाबाहेर चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताला अटक
