GRAMIN SEARCH BANNER

राज्यात दहा वर्षांत ४६ हजार सायबर गुन्हयांची नोंद, ११ हजार ३३ कोटी रुपयांची फसवणूक

मुंबई: राज्यात आर्थिक गुन्हेगाराची प्रमाण वाढत असून मागील दहा वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे एक कोटी पाच लाख गुंतवणुकदारांची आर्थिक लूट झाली आहे. या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांची २२ हजार ५५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

राज्यात २०१६ पासून ४६ हजार ३२१ सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. या सायबर गुन्हयात ११ हजार ३३ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधानपरिषदेत दिली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आर्थिक फसवणूकीचे प्रमाण जास्त आहे. नॅशनल सायबर क्राईम रिर्पोटींग पोर्टल नुसार गेल्या वर्षी मुंबईत ३१ हजार ५८३ प्रकरणे आर्थिक फसवणूकीची आहेत. मुंबई, ठाणे व पुणे या मोठया शहरात एकूण ५८ हजार १५७ सायबर गुन्हे नोंद झाले आहेत. यात १ हजार १८६ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केली गेली आहे. पुण्यात हे प्रमाण १३ हजार ९७१ आहे तर ठाण्यात १२ हजार ५८२ गुन्ह्यांचे आहे.

अकाेला सारख्या शहरातही यंदा ५४० प्रकरणे सायबर तक्रारी पोलिसांकडे आली आहेत. दोन प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. आर्थिक फसवणूकीचा या गुन्हयांची तपास करण्यासाठी एकूण ५० सायबर पोलिस ठाणी सुरु करण्यात आली आहेत. गुंतवणुकींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांबाबत आगाऊ माहिती मिळविण्यासाठी शासनाने आर्थिक गुप्तवार्ता कक्षाची या अगोदर स्थापना केली असल्याचे फडणवीस यांनी सदस्य सतेज पाटील, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड यांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना सांगितले.

Total Visitor

0214193
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *