मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठा निर्णय घेतला आहे. एकूण १७ हजार ४५० कंत्राटी पदांवर चालक व सहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
महामंडळाच्या ३००व्या कंत्राटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून निवड झालेल्या उमेदवारांना एसटीत कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांचा करारनामा करून नियुक्ती दिली जाणार आहे. निवडीनंतर उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षण देऊनच कामावर रुजू करण्यात येईल.
भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबरपासून सहा प्रादेशिक विभागनिहाय राबवली जाणार आहे. कंत्राटी नियुक्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दरमहा किमान ३० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असून, एकाच वेळी हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
ब्रेकिंग : एसटी महामंडळात १७ हजार पदांची भरती; तरुणांनो अभ्यासाला लागा
