रत्नागिरी : तालुक्यातील टेंभे येथील प्रकाश शंकर खाडे (60) यांचा गुरुवारी (२९ ऑगस्ट २०२५) रात्री अचानक चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीचे जेवण करून टीव्ही पाहत असताना ही घटना घडली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश खाडे हे हातिस, तोणंदे येथे वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे जेवण करून घरात टीव्ही पाहत होते. त्याचवेळी, बाथरूमध्ये जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पाठीवर पडले. खाडे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे नातेवाईक जयवंत धोंड नागवेकर यांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी प्रकाश खाडे यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : टेंभे येथील वृद्धाचा टीव्ही पाहताना मृत्यू
