GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात जिल्हा परिषद गट आरक्षणात OBC समाजाला स्थान नाही;गाव विकास समितीकडून तीव्र नाराजी

Gramin Varta
256 Views

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणाची नवीन रचना जाहीर झाली असून, यात एकाही गटात इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी आरक्षण न ठेवल्याने तालुक्यात ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण पसरले आहे. या नव्या रचनेत ओबीसी समाजाला डावलले गेले असल्याची भावना निर्माण झाली असून,याबाबत गाव विकास समितीचे एड सुनिल खंडागळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जाहीर झालेल्या नवीन गट रचनेनुसार तालुक्यातील सात गटांचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे:
धामापूर तर्फे संगमेश्वर – सर्वसाधारण

कडवई – सर्वसाधारण

कसबा संगमेश्वर – सर्वसाधारण स्त्री

मुचरी- सर्वसाधारण स्त्री

कोसुंब- सर्वसाधारण

साडवली- सर्वसाधारण स्त्री

दाभोळे- सर्वसाधारण

तर लांजा तालुक्यातील आरक्षण

आसगे – सर्वसाधारण स्त्री

भांबेड -सर्वसाधारण स्त्री

साटवली – सर्वसाधारण स्त्री

गवाणे – सर्वसाधारण


वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की, सातपैकी तीन गट सर्वसाधारण महिलांसाठी, तर चार गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. मात्र, यात ओबीसी प्रवर्गाला एकही जागा न मिळाल्याने संगमेश्वर तालुक्यातील ओबीसी समाजाला सामाजिक प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे दिसून येते.

या गंभीर विषयावर गाव विकास समितीचे एड.सुनिल खंडागळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “तालुका पातळीवर सामाजिक प्रतिनिधित्व देताना संपूर्ण जिल्ह्यात समतोल राखायला हवा होता. मात्र, संगमेश्वर तालुक्याला यातून वगळून ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ही बाब सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धरून नाही.”

केवळ संगमेश्वरच नव्हे, तर शेजारील लांजा तालुक्यातही ओबीसी समाजाला जिल्हा परिषद गटात प्रतिनिधित्व मिळत नसल्याने गाव विकास समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत असून, या निर्णयावर प्रशासनाने फेरविचार करावा,व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ओबीसी आरक्षण समतोल राखायला हवा होता असे मत खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

3369942
Share This Article