रत्नागिरी: शहरातील नाचणे परिसरात भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडली. संजय रमेश पावसकर (वय ५५, रा. घर नं. ७०७ ई, छत्रपती नगर, नाचणे) यांच्या मालकीची एक्सेस १२५ ही गडद जांभळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक MH-०४/KE-७२०८) अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना ८ जुलै रोजी सकाळी ७.४५ ते ९.१५ या वेळेत त्यांच्या घरासमोर घडली. अंदाजे २० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात ९ जुलै २०२५ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.