GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा येथे डंपर पलटी; चालक जखमी

Gramin Varta
54 Views

रत्नागिरी / समीर शिगवण: तालुक्यातील हातखंबा येथील उतारावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डंपर खड्ड्यात पडून अपघात झाला. या दुर्घटनेत डंपर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पालीहून रत्नागिरीकडे जात असलेला डंपर हातखंबा दर्ग्याजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे डंपर विरुद्ध दिशेला जाऊन उजव्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाला. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी पुढाकार घेतला. संबंधित यंत्रणांकडून अपघातस्थळी योग्य ती कार्यवाही सुरू आहे.

Total Visitor Counter

3368658
Share This Article