रत्नागिरी : पुढील ३ ते ४ तासांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अचानक होणाऱ्या जोरदार सरी, वाऱ्याचा वेग वाढणे, विजांचा कडकडाट यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सखल भागांमध्ये पाणी साचणे, लहान नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, घराबाहेर न पडण्याचे व सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मासेमारी, शेतीकामे वा ओढ्याजवळील हालचाली काही वेळ थांबवाव्यात, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी अधिकृत सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे
