रत्नागिरी : रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता बुलडाणा येथील बाबुराव महामुनी रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक पदी रुजू होणार आहेत.
जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षकपदी गेली अडीच वर्षे कार्यभार सांभाळला. यात त्यांनी बारसु प्रकल्प तसेच इतर बंदोबस्तात चोख कामगिरी पार पाडली होती.