GRAMIN SEARCH BANNER

निसर्ग रक्षणासाठी चिपळूणमध्ये वन अधिकाऱ्यांशी चर्चा

चिपळूण: चिपळूणमधील महायुती समन्वयक, व्यापारी बांधव आणि निसर्गप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी चिपळूणचे वन अधिकारी सौ. देसाई-पाटील यांची भेट घेऊन वने, वृक्षसंवर्धन, प्राणीजीव संरक्षण, सह्याद्री पर्वतरांगांचे निसर्ग संवर्धन, वृक्षलागवड आदी विविध विषयांवर सखोल चर्चा केली.

या चर्चेदरम्यान पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना वन अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. संबंधित विषयांवर त्यांनी दिलखुलास संवाद साधला. लवकरच चिपळूण तालुक्यातील निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी व सह्याद्री संवर्धन कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे. बैठकीनंतर झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्यासोबत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.

या भेटीवेळी माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे, व्यापारी महासंघटना अध्यक्ष किशोर रेडीज, महायुती समन्वयक उदय ओतारी, निसर्ग व जलदूत शहनवाज शाह, निसर्गप्रेमी केसर देसाई, पर्यावरणप्रेमी अजित जोशी आणि पृथ्वी पवार यांनी सहभाग घेतला.

Total Visitor Counter

2475388
Share This Article