संगमेश्वर : तालुक्यातील कुडवली नवेलेवाडी ते बौद्धवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी गवा फिरताना दिसला. भरदिवसा बिबट्याच्या वावरामुळे वाहनचालकांत भीती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता एका नागरिकाला गवा रस्त्यावर उतरल्याचे दिसले.
गवा रस्त्यावरून निर्धास्तपणे चालत असताना त्यानी पाहिला.काही वेळाने गवा जंगलात शिरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगमेश्वर : कुडवली मुख्य रस्त्यावर गव्याचे दर्शन
