GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी एमआयडीसीत 26 वर्षीय तरुण खोलीत बेशुद्धावस्थेत आढळला, आकस्मिक मृत्यूने खळबळ

रत्नागिरी: शहरातील नाचणकरचाळ, एम.आय.डी.सी. रेस्ट हाऊस येथे एका २६ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संदीप कुमार विश्वनाथ रावत असे मयत तरुणाचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी होता आणि रत्नागिरीत अनिल नाचणकर यांच्याकडे भाड्याने राहात होता.

२६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता संदीप कुमार रावत त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ बसलेला दिसला होता, असे त्याच्या चुलत भावाने (फिर्यादी) सांगितले. सायंकाळी ७.३० वाजता काम संपवून परत आल्यावर फिर्यादीने संदीपच्या खोलीबाहेर गर्दी पाहिली. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने, कटावणीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता, संदीप कुमार निपचित बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला.

त्यानंतर तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने रात्री ८.०० वाजता रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणी करून संदीप कुमारला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Total Visitor Counter

2474815
Share This Article