मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि. 12 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.
हा सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे भूषविणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती माधव जामदार, तसेच जिल्हा न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण सोहळा समारंभानंतर स्वागत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड येथे आयोजित करण्यात आला असून, मंडणगड आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, मंडणगड वकील संघ अध्यक्ष ॲड. मिलिंद अ. लोखंडे, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्याय दंडाधिकारी वर्ग-1 सौ. अमृता जोशी आहेत.
सरन्यायाधीश भूषण गवई उद्या मंडणगडमध्ये
