चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बस स्थानका समोर शनिवारी सकाळी ३ वाहनांचा अपघात झाला. एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जखमी झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली.
सावर्डे बस स्थानकासमोर असणाऱ्या सर्विस रोडवर वाहने उभी असतात. असे असताना एका कार चालकाने दोन वाहनांना धडक दिली. एकमेकावर ही वाहने आदळल्याने हा अपघात घडला. यात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.