GRAMIN SEARCH BANNER

पुणे: कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणारे वाहन दरीत कोसळून ९ ठार, २९ गंभीर जखमी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

पुणे – येथील खेड तालुक्यात पिकअप वाहन १०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त गाडीतील भाविक महिला तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वराच्या दर्शनाला जात होत्या. या दुर्घटनेतील जखमींना खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व अपघातग्रस्त एकाच गावचे आहेत. पापळवाडी गावचे हे रहिवासी आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. पापळवाडी गावातील 40 जण कुंडेश्वर दर्शनाला निघाले होते. यावेळी खेड येथील पाईट गावाजवळ नागमोडी वळणावर घाट चढताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप जिप (एमएच १४ जीडी ७२९९) 100 फूट खोल दरीत कोसळली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अंदाजे २५ ते ३० फूट खाली रस्त्याच्या उतारावरून कोसळली.

स्थानिक तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. यानंतर पोलिस आणि वैद्यकीय बचावर पथक घटनास्थळी दाखल झाले. 10 रुग्णवाहिकांतून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिकअप दरीत पडल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे येत होते. सर्व जखमींवरती खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालय, चाकण ग्रामीण रुग्णालयासह विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

2475129
Share This Article