GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात तालुकास्तरीय कबड्डी पंच शिबीर संपन्न

✍️ तुषार पाचलकर / राजापूर

रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हा कबड्डी पंच परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनमार्फत एक दिवसीय पंच शिबिराचे आयोजन धर्मशाळा, राजापूर येथे करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्हा पंच परीक्षेला बसणारे परीक्षार्थी व जिल्हा तसेच राज्य पातळीवरील पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराला राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राजू दिवटे, सचिव प्रवीण बाणे, पंचप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य पंच संदीप पवार, दादासो ठोंबरे, सचिन नाचणेकर, अर्बन बँकेचे माजी संचालक सुनील जाधव, तायक्वांदो प्रशिक्षक महेश नाचरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पंचप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करत परीक्षेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचे नमुने, कबड्डीचे नियम, मैदान आखणी, मापे, स्कोअरशीट भरणे, लॉट्स टाकण्याची प्रक्रिया व व्हिसलिंगच्या माध्यमातून निर्णय देण्याच्या तांत्रिक बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनास राज्य पंच संदीप पवार यांनी मोलाची साथ दिली.

शिबिरानंतर सर्व परीक्षार्थींनी समाधान व्यक्त करत राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनचे आभार मानले. शेवटी तालुका सचिव प्रवीण बाणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता केली.

Total Visitor Counter

2455606
Share This Article