प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती; आमदार डावखरे, आमदार सागर, आमदार जठार यांचीही उपस्थिती
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवारी (ता.9) रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्रदेश महामंत्री, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री, आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, सिंधू रत्न योजनेचे उपाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव, जिल्हा सरचिटणीस आनंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जि. प. गटनेते प्रमोद अधटराव, देवरुखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समिर तिवरेकर, शुभमच्या उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऐश्वर्या जठार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष, विविध सेल व प्रकोष्ठ यांचे जिल्हा संयोजक, सर्व मंडल अध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजपच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक रत्नागिरीत मोठ्या उत्साहात संपन्न
Leave a Comment





