पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सन्मान
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पाच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सोमवार, ३० जून २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष ‘सेवानिवृत्ती कार्यक्रमा’त त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. या प्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या सेवाकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या एकनिष्ठ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बगाटे यांनी या सर्व अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदी आणि निरोगी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या भावनिक आणि गौरवशाली सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (पो. मुख्या.) श्रीमती. राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. नितीन ढेरे, सपोनि. श्री. युवराज सूर्यवंशी (कल्याण शाखा) यांच्यासह सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी, रत्नागिरी पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:
