GRAMIN SEARCH BANNER

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

सांगली: मराठी साहित्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे वीज क्षेत्रात संचालक म्हणून काम केलेले डॉ. मुरहरी केळे यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तर्फे मराठी विषयात पीएच.डी. ही सर्वोच्य पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांनी  “निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास” या आगळ्या-वेगळ्या विषयावरील शोधप्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला होता.

डॉ. केळे यांनी आपल्या संशोधनात गेल्या एक हजार वर्षातील निवडक काव्यात्म, कथनात्म, नाट्यात्म साहित्याचा अभ्यास करून एका वेगळ्या विषयाकडे मराठी अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. विजविषयक साहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भावनिक, वैज्ञानिक आशयांचा सखोल मागोवा घेतांना ‘वीज’ या संकल्पनेचा वैदिक साहित्यापासून संत-पंत-तंत साहित्याचा वेगवेगळ्या अंगाने मागोवा घेत प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक आणि अत्याधुनिक साहित्याचा आढावा घेवून त्यांनी अभ्यासपूर्ण असे निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या अतिशय त्यांच्या हटके संशोधन कार्याचे मराठी साहित्य विश्वात कौतुक करण्यात येत आहे.

डॉ.मुरहरी केळे यांना शिक्षणाची प्रचंड आवड असून त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांतून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान, पत्रकारिता, उर्जा अंकेक्षण या वेगवेगळ्या व्यावसायिक विषयात दहा पदव्या घेतल्यानंतरही स्वस्थ न बसता नागपूर विद्यापीठातून ‘पॉवर डीस्ट्रीब्यूशन फ्रान्चायसी’ या विषयावर पहिली पीएच.डी. घेतली असतांना देखील मराठी विषयाची आवड असल्यामुळे त्यांनी मराठी भाषेत एम.ए.करून दुसरी पीएच.डी.मिळवली.    

या दुहेरी यशाबद्दल त्यांचे तेलंगणाचे राज्यपाल आणि त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. जिष्णू देव वर्मा, विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू यांचेसह विविध साहित्यिक, प्राध्यापक, अभ्यासक, समाजबांधव आणि वीज क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून अभिनंदन होत असून, मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली जात आहे.

Total Visitor Counter

2475127
Share This Article