GRAMIN SEARCH BANNER

अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल कार्यालयाचे शानदार उद्घाटन: महिला सक्षमीकरणाच्या कार्याला प्रोत्साहन!

लांजा : तालुक्यातील कोर्ले तिठ्यामधील बसवेश्वर चौकातील रॉयल पार्क बिल्डिंगमध्ये अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल कार्यालयाचे शानदार उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. आमदार भैय्यासाहेब उर्फ श्री. किरण सामंत यांच्या शुभहस्ते आणि ओणी आश्रम प्रमुख वंदनीय श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे साहेब, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका सौ. छाया मंदार गांगण यांनी लांजा येथील महिलांना आपल्या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणाचा संकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. त्यांनी आतापर्यंत लांजा परिसरातील ३०० हून अधिक महिलांना प्रशिक्षित केले असून, आता त्यांनी लांजा बाजारपेठेत आपले अद्ययावत ड्रायव्हिंग स्कूल कार्यालय सुरू केले आहे. त्यांच्या या उपक्रमास ओणी येथील गगनगिरी आश्रमाचे प्रमुख आदरणीय श्री. उल्हासगिरी महाराज यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले, त्याचबरोबर स्थानिक आमदार श्री. किरण सामंत यांनी उद्घाटन करून त्यांना प्रोत्साहित केले. पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे साहेब यांनी सौ. छाया मंदार यांच्या महिला सक्षमीकरण कार्याचे कौतुक करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री. सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांचे श्री. व सौ. छाया मंदार गांगण यांनी आभार मानले.

Total Visitor Counter

2455556
Share This Article