GRAMIN SEARCH BANNER

राज्यात होणार 1700 पदांची तलाठी भरती

मुंबई : राज्यात तलाठ्यांच्या २४७१ जागा रिक्त आहेत. तसेच बावनकुळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

त्यामुळे हि तलाठी भरती प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरु होणार असल्याचे दिसत आहे. तसेही, सध्या एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आहे. तसेच तलाठ्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत.
सन २०१८-२०१९ मध्ये तलाठी भरती झाली. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती. २०२३-२०२४ मध्ये भरती पुन्हा सुरू झाली. सरळसेवेने २०८ तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे २८ पदे भरली. त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आली नाही. मात्र, नवीन आकृतीबंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांची एकूण ६५४ पदे मंजूर आहेत. त्यातील ६१९ तलाठ्थांची भरती झाली आहे. उर्वरित ३५ पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांच्या कमी जागा रिक्त आहेत.

राज्यात शासनाच्या एकूण विभागांपैकी महसूल विभाग महत्त्वाचा विभाग समजला जातो. कारण या विभागाकडूनच राज्याला महसूल मिळतो. कोरोनामुळे मध्यन्तरी तलाठी भरती प्रक्रिया रखडली, त्यानंतर लोकसभा-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका व न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती थांबली होती. राज्यात २४७१ तलाठ्यांची पदे रिक्त आहेत, तर जिल्ह्यात महसूल सहापकांव्या १४१ जागा रिक्त आहेत. जागा भरल्या तर कामाला गती येणार आहे. लोकांची कामेही लवकर होतील. तलाठीच्या रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांसह शेतकऱ्यांचीही कामे थांबलेली आहेत. पुनर्वसन, महसूल आणि भूसंपादन यासह राज्यातील महसूल विभागात ३ हजार पदे रिक्त आहेत. यात २ हजार ४७१ तलाठ्यांचीच पदे रिक्त असल्याने आजच्या घडीला एकेका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. विविध जिल्ह्यात नवीन भरती तलाठी भरतीतून तलाठी मिळतील. राज्याला सर्वाधिक महसूल हा याच विभागाकडून मिळतो. यात तलाठ्यांचा हा मुख्य कणा आहे. त्यामुळे शासन तलाठी भरती प्रक्रिया लवकरच राबवेल अपेक्षा आहे.

राज्यात महसूल विभागात सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक २४७१ रिक्त पदे तलाठ्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी १५ दिवसातून एकदाच येतात. यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार- वेळा तरी चढाव्याच लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावरदेखील पडतो. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी ‘क’ वर्गाचा क्रमांक पहिला आहे. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. सातबारा, शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात. तलाठ्याची गावपातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे येत्या २०२५ तलाठी भरती होणे आवश्यक आहे. तेव्हाच राज्याची सुव्यवस्था आटोक्यात येईल. सरकार सुद्धा या दिशेनं पॉल उचलेल आणि हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे समजते.

Total Visitor Counter

2455997
Share This Article