GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड :  आंबवणे येथे ७५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
64 Views

मंडणगड: मंडणगड तालुक्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. आंबवणे गावामध्ये गजानन रामजी पवार (वय ७५) या वृद्ध व्यक्तीने दारूच्या अति व्यसनातून आलेल्या नैराश्यातून गळफास लावून घेऊन आपले जीवन संपवले.

ही घटना ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०९.०० वाजल्यापासून ते ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आंबवणे येथील रहिवासी असलेले गजानन पवार हे एकटे राहत होते. त्यांची पत्नी आणि कुटुंबीय त्यांच्यापासून वेगळे राहत असल्याने ते अतिशय नैराश्यात होते, त्यातच त्यांना दारूचे मोठे व्यसन होते. याच नैराश्यातून आणि व्यसनाच्या त्रासातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. मंडणगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आमृ. क्रमांक १३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस.एस.) १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकाकीपणामुळे आणि व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून ज्येष्ठ नागरिकाने स्वतःचे जीवन संपवल्यामुळे आंबवणे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2648025
Share This Article