GRAMIN SEARCH BANNER

विषारी द्रव प्राशन केल्याने हातखंबा येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
32 Views

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथील तरुणाने विषारी द्रव प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. २६ जून २०२५ रोजी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय श्रीकांत बोंबले (वय ४५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विष प्राशन केल्यानंतर बोंबले यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3370202
Share This Article