देवरूख : साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या इंडियन नेव्हीच्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून देवरूखचा मयुराज टक्के याची निवड झाली आहे. हा मान मिळवणारा मयुराज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान ठरला आहे.
या आंतरराष्ट्रीय कॅम्पमध्ये केनिया, साऊथ आफ्रिका, मोझाम्बिक आणि टांझानिया या देशांमध्ये भारतीय नौदलाच्या सहभागाने विविध नौदल सराव, प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित केले जातात. देशभरातील सर्वोत्तम NCC कॅडेट्समधून निवड झालेला CC मयुराज टक्के महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
OSD हा भारतीय नौदलाचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून, या अंतर्गत निवडक NCC कॅडेट्सना भारतीय नौदलाच्या जहाजावर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची आणि परदेशी नौदलांशी अनुभव देवाणघेवाण करण्याची संधी मिळते.
यापूर्वीही मयुराज टक्के यांनी ऑल इंडिया नोसैनिक आणि नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धा मध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातून अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
देवरूखच्या मयुराज टक्केची साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या ‘इंडियन नेव्ही’च्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी निवड







