खेड: खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. परिसरात हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मेनगेट समोरील सर्व्हिस रोडवर पार्क केलेली ५५,०००/- रुपये किंमतीची एक हिरो कंपनीची पॅशन प्रो बी.एस.०६ (क्रमांक: एम.एच.०८ ए.झेड २६३७) मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.०० ते ८.२३ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
याप्रकरणी मोटारसायकलचे मालक निखिल दत्ताराम कराडकर (वय अंदाजे २८) यांनी खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी सध्या असगणी येथील समर्थनगर, लालजी आंबेडकर वाचे घरी भाड्याने राहतात. त्यांचे मूळ गाव शेल्डी, कराडकरवाडी, ता. खेड जि. रत्नागिरी आहे.
निखिल कराडकर यांची ५५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांची कोणतीही संमती न घेता, लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे. घटनेच्या दोन दिवसांनी, या चोरीची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील कामगार आणि रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
लोटे एमआयडीसीतून ५५ हजार रुपयांची मोटारसायकल चोरीला!





