GRAMIN SEARCH BANNER

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नुपूर दफ्तरदारला सुवर्ण पदक

Gramin Varta
82 Views

रत्नागिरी : खेडशी येथील पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूलची कु. नुपूर निलेश दफ्तरदार हिने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो प्रकारात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.

स्पर्धेदरम्यान नुपूरने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत प्रतिस्पर्ध्यांना दमदार टक्कर दिली. तिच्या निखळ मेहनतीमुळे व क्रीडाप्रेमामुळेच हे यश मिळाल्याचे तिचे मार्गदर्शक शिक्षक सांगतात.

या विजयामुळे नुपूरची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून पुढील पायरीतही ती दमदार प्रदर्शन करेल, अशी शाळा व कुटुंबीयांची अपेक्षा आहे.

नुपूरच्या या यशामागे तिचे पालक, प्रशिक्षक तसेच शाळेचे शिक्षक यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शाळा व्यवस्थापन, संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी नुपूरचे मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्थानिक क्रीडाप्रेमींनीही “नुपूर हे उदयोन्मुख खेळाडूचे प्रेरणादायी उदाहरण आहे,” अशा शब्दांत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Total Visitor Counter

3369676
Share This Article