GRAMIN SEARCH BANNER

लांजा तालुक्याचा तायक्वॉंदो स्पर्धेत झेंडा फडकावला; १८ पदकांची कमाई, त्रिशा यादव ‘बेस्ट फायटर’

Gramin Varta
129 Views

लांजा : नुकत्याच चिपळूण येथे पार पडलेल्या २५व्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत एकूण १८ पदकांची कमाई केली. यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा प्रकारात पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्रिशा गणेश यादव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार पटकावला.

ही स्पर्धा रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्कर स्वामी मंगल कार्यालय, चिपळूण येथे पार पडली. यावेळी तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांत घडशी, संचालक संजय सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलेली पदके:

🔸 ७ वर्षांखालील मुली गट

सुवर्णीम श्रेयस शेट्ये – सुवर्णपदक

युगा प्रसाद डोर्ले, मायरा कुणाल जगताप – रौप्य

अन्वी सचिन पवार – कांस्य


🔸 मुलांचा गट

आराध्य महेश महाले – सुवर्णपदक


🔸 सब ज्युनियर गट (मुली)

त्रिशा गणेश यादव – सुवर्णपदक व ‘बेस्ट फायटर’


🔸 कॅडेट गट (मुली)

भक्ती कुंभार, परी जड्यार, तेजस्वी लाड – रौप्य

तीर्था यादव – कांस्य


🔸 कॅडेट गट (मुले)

रुद्र सुर्वे – सुवर्णपदक

सय्यद साद सलीम, भाव्य पटेल – रौप्य

नैतिक शेट्ये – कांस्य


🔸 ज्युनियर गट (मुले)

योगेश तोंडारे – सुवर्णपदक

राकेश पवार, श्रेयस सावंत – कांस्य


स्पर्धेत सहभागी खेळाडू – आराध्य सावंत, दत्तप्रसाद बावदनकर, आर्या पवार, वृत्ती पावसकर, रोहन साबळे, आदी पावसकर, भाविन पटेल, आफताब कोंडकरी, अब्दुल्ला सय्यद, अर्ष कालसेकर, प्रतीक कोतवडेकर

प्रशिक्षक व मार्गदर्शक मंडळ – तेजस पावसकर, शितल आचरेकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे

प्रशासन व संघटन समितीचे अभिनंदन – किशोर यादव (अध्यक्ष), अमोल रेडीज (उपाध्यक्ष), तेजस्विनी आचरेकर (सचिव), अनुजा कांबळे (सहसचिव), रोहित कांबळे (सदस्य), तसेच मार्गदर्शक तेजस वडवलकर व सर्व पालकवर्ग यांनी सर्व विजेते व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3367003
Share This Article