GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत तरुणाची आत्महत्या

Gramin Varta
176 Views

दापोली : तालुक्यातील पणदेरी बौद्धवाडी येथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन शंकर कांबळे (वय ३९, रा. पणदेरी, बौद्धवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही काळापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. यातूनच नैराश्याने ग्रासलेल्या नितीन यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

१७ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या बेडरूममध्ये लाकडी वाशाला नायलाॅनच्या पिवळ्या दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती दाभोळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Total Visitor Counter

2650279
Share This Article