GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या संशयिताला जामीन

Gramin Varta
8 Views

रत्नागिरी : शहरानजीकच्या परिसरातील 16 वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मोहसीन दस्तगिर नदाफ (१९, रा. एकतानगर, खेडशी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

मोहसीन याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच पोलिसांकडून त्याला अटकही करण्यात आली होती. नदाफ हा १६ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता, अशी तक्रार मुलीच्या वडिलांकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली होती.

५ जुलै २०२५ रोजी पीडित मुलीचे वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, आरोपीने कार वेगाने चालवत तेथून पळ काढला. यावेळी त्याने काही अन्य गाड्यांचेही नुकसान केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले.

Total Visitor Counter

2651278
Share This Article