राजापूर (प्रतिनिधी) –
राजापूर शहर व परिसरातील विविध स्थानिक प्रश्नांवर तोडगा निघावा, या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते अमृत तांबडे यांनी उद्यापासून राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे.
तांबडे यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत –
◼️राजापूर शहरात पोलिसांसाठी निवासी घरे उपलब्ध करून द्यावीत.
◼️राजापूर बाजारपेठेत मच्छी व कोंबडी विक्रेते नदीत टाकणारी घाण थांबवावी.
◼️‘जवाहर चौक ते तालीमखाना’ रस्त्याचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला तालुक्यात कुठेही काम देऊ नये.
◼️कोदवली धरण बांधकामास त्वरित सुरुवात करावी आणि विलंबाबाबत कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी.
◼️प्रांत कार्यालयाच्या उद्घाटनाला एक वर्ष उलटूनही इमारत पूर्ण न झाल्याने त्वरित काम सुरू करावे.
◼️राजापूर शहरातील मराठी शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा.
◼️कोदवली पुनर्वसनातील पात्रांना तातडीने प्लॉट वाटप करावे.
तांबडे यांनी सांगितले की, “स्थानिक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रश्न सुटेपर्यंत उपोषण सुरूच राहील.”
मनसे कार्यकर्ते अमृत तांबडे यांचे उद्यापासून तहसीलसमोर उपोषण
