GRAMIN SEARCH BANNER

भारतात लोकशाहीवर हल्ला होतोय, आपण चीनसारखे लोकांना दाबू शकत नाही -राहुल गांधी

Gramin Varta
31 Views

दिल्ली: भारतामध्ये सध्या लोकशाहीवर सर्व बाजूंनी हल्ले होत आहेत. भारत चीनप्रमाणे लोकांना दाबू शकत नाही, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशातील लोकशाही आणि भारत-चीन संबंधांबद्दल भाष्य केलं आहे.

ते गुरुवारी(दि.२) कोलंबियाच्या ईआयए विद्यापीठात एका संवाद कार्यक्रमात बोलताना बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्था सर्वांसाठी स्थान देते, पण सध्या लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होतोय.

पुढे कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना विचारण्यात आले की पुढील ५० वर्षांत भारत आणि चीन जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत का? यावर त्यांनी उत्तर दिले, “मला चीनबद्दल निश्चित माहिती नाही, पण मला वाटत नाही की भारत स्वतःला जगाचे नेतृत्व करणारे मानतो. भारत हे चीनचे शेजारी आहे आणि अमेरिका सोबत घनिष्ठ भागीदार. आपण त्या ठिकाणी बसलो आहोत जिथे या दोन सामर्थ्ये एकमेकांना भिडत आहेत.”

पुढे त्यांनी सांगितले, “भारत जगाला बरेच काही देऊ शकतो, आणि मी खूप आशावादी आहे, पण त्याच वेळी भारतीय संरचनेमध्ये काही कमतरता आणि धोके आहेत ज्यांना पार करावं लागेल. सगळ्यात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर होणारा हल्ला. भारत हा संवादाचा केंद्र आहे आपल्या सर्वांच्या मध्ये. विविध परंपरा, धर्म, विचार यांना स्थान गरजेचा आहे आणि त्या स्थानाची निर्मिती करण्याचा सर्वोत्तम मार्ग लोकशाही व्यवस्था आहे.”

“दुसरा धोका म्हणजे देशाच्या विविध भागांदरम्यान दरार वाढली आहे. सुमारे १६-१७ भिन्न भाषा आणि विविध धर्म आहेत. या विविध परंपरांना फुलण्याची संधी देणं, त्यांना अभिव्यक्तीची मुभा देणं, हे भारतासाठी अत्यावश्यक आहे. आपण ते करू शकत नाही जे चीन करतो. लोकांना दाबणं आणि एक तानाशाही व्यवस्था चालवणं. आपल्या व्यवस्थेने ते स्वीकारणार नाही.”

राहुल गांधी म्हणाले, “भारतामध्ये आर्थिक वाढ असूनही, आम्ही रोजगार देण्यात अपयशी ठरत आहोत कारण आपल्या अर्थव्यवस्थेचा आधार सेवा क्षेत्रावर आहे आणि आपण उत्पादन क्षेत्रात मागे आहोत. अमेरिकेत जे लोक ट्रम्पबरोबर आहेत, त्यांना बहुतेक उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. चीनने एक अव्यवहारिक-लोकशाही वातावरणात उत्पादनाचा विकास केला आहे, पण आपल्याला लोकशाही संरचनेत असलेलं मॉडेल विकसित करण्याची गरज आहे, जे चीनला स्पर्धा देऊ शकेल.”

Total Visitor Counter

2645294
Share This Article