दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतीय निवडणूक आयोगाने 334 मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, ही कारवाई निवडणूक प्रणाली शुद्ध करण्याच्या व्यापक आणि सातत्यपूर्ण धोरणाचा एक भाग आहे.
या निर्णयानंतर सध्या देशात 6 राष्ट्रीय, 67 राज्यस्तरीय आणि 2,520 नोंदणीकृत मान्यता नसलेल्या राजकीय पक्ष अस्तित्वात राहतील. नियमांनुसार, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी किमान सहा वर्षांत एकदा तरी निवडणूक लढवणे आणि पक्षातील कोणत्याही बदलाची माहिती आयोगाकडे अद्ययावत करणे बंधनकारक आहे.
जून महिन्यात आयोगाने आपल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 अंतर्गत घालून दिलेल्या अटींचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी 345 पक्षांची चौकशी सोपवली होती. या चौकशीअंती आढळले की 345 पैकी 334 पक्षांनी नियमांचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुन्हा पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाकडून 334 मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
