GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : नागपूर-मडगाव विशेष गाडी दररोज सोडण्याची मागणी

Gramin Varta
204 Views

रत्नागिरी : मध्य रेल्वेची गणेशोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेली नागपूर-मडगाव विशेष गाडी (क्र.०११३९/४०) दररोज सोडण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. विदर्भ खान्देश येथील खासदार तसेच रेल्वे मंत्र्यांना तसेच रेल्वे विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

विदर्भ खान्देशातील नागरिकांना कोकण प्रांतात पोहोचण्यासाठी मध्य रेल्वे नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी दररोज सोडावी, तसेच या गाडीला चांदूर, मूर्तिजापूर, नांदुरा, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, पेण येथे अतिरिक्त थांबे सुरू करावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था (कल्याण-सावंतवाडी) संस्थेचे मध्य, कोकण रेल्वे अभ्यासक तथा विदर्भ खान्देश मराठवाडा संपर्कप्रमुख प्रांतप्रमुख वैभव बहुतुले यांनी विदर्भ, खान्देश, कोकणातील खासदार, केंद्रीय मंत्री तसेच रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडे पत्राद्वारे केली आहे.

कोकण आणि विदर्भातील लोकांना एकमेकांच्या भागातील विविध धार्मिक, शैक्षणिक संस्था, दीक्षभूमीसारख्या विविध स्थळांना भेट देणे या नियमित गाडीमुळे शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही भागातील शेतमालालाही बाजारपेठ मिळणे शक्य असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Total Visitor Counter

2647287
Share This Article