चिपळूण : मा. बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कामथेच्या माजी विद्यार्थिनी कु. मानसी दीपक तटकरे हिची महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे येथे पोलीस खात्यात नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाच्या प्रमुखाध्यापिका सौ. डिंगणकर आणि सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते मानसीचा यथोचित सत्कार करण्यात आला. तिच्या यशाचे कौतुक करत सर्वांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात श्री. भूषण कांबळी यांनी मनोगत व्यक्त करत मानसीला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर सौ. डिंगणकर मॅडम व श्री. नटे सर यांनीही प्रेरणादायी शब्दांत तिचा सन्मान केला.
या कार्यक्रमात श्री. संदीप थोरवडे यांनी मानसीची मुलाखत घेतली. संवादादरम्यान मानसीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले, “आई-वडिलांचा सन्मान, गुरूजनांचा आदर, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्कीच मिळते.”
तिच्या विचारांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला.
कार्यक्रमाचे नियोजन श्री. नटे सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. प्रदीप ठसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कामथे येथील मानसी तटकरे पोलीस खात्यात अधिकारी! बाळासाहेब माटे विद्यालयात गौरव
