राजापूर: राजापूर एस.टी. आगाराच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल झाल्या असून, या बसेसचा लोकार्पण सोहळा रविवारी राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पार पडला. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याने नागरिक आणि प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे राजापूर आगाराला या अत्याधुनिक ६ प्रणालीच्या ५ नवीन बसेस मिळाल्या आहेत. या बसेसमुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्यासोबत आगार व्यवस्थापक अजितकुमार गोरसाळे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, सहायक कार्यशाळा अधीक्षक प्रकाश झारे, अनिल कुवेस्कर, राजेंद्र पाटोळे, सुबोध बाकाळकर, अक्षय मांडवकर, शहर प्रमुख सौरभ खडपे यांच्यासह आगाराचे सर्व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन बसेसमुळे प्रवाशांना उत्तम सेवा मिळेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.