श्रमदानातून जावडे–कातळगाव अंतर्गत रस्त्याला मिळाला नवा श्वास; नामयेवाडी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम

Gramin Varta
563 Views

लांजा/अरबाज नेवरेकर:-जावडे येथील बांधाचां पऱ्या ते कातळगाव या अंतर्गत रस्त्यावर वाढलेली झाडी-झुडपे, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नामयेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून रस्ता स्वच्छ व वाहतुकीसाठी सुकर केला.

या श्रमदानामध्ये रस्त्यालगतची वाढलेली झाडी-झुडपे हटविण्यात आली तसेच रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे एसटी बस सेवा, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि गावाप्रती असलेली कर्तव्यभावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. सामूहिक श्रमाच्या बळावर गावातील सार्वजनिक समस्या सोडविण्याचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

या श्रमदानात सहभागी झालेल्या नामयेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4820689
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *