लांजा नगरपंचायतीच्यावतीने शहरात एकल महिला सर्वेक्षण सुरू

Gramin Varta
92 Views

फरहान पाटणकर/लांजा: महाराष्ट्र शासनाच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच धर्तीवर, लांजा नगरपंचायतीने एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याची महत्त्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे.

समाजातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या महिलांची अचूक माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण केले जात आहे. नगरपंचायतीचे हे सर्वेक्षण केवळ लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रापुरते मर्यादित असणार आहे.

या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे नोंदणी फॉर्म लांजा नगरपंचायत कार्यालयातील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) विभागामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २० ऑगस्टपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर सर्वेक्षणाची अंतिम मुदत २८ ऑगस्ट आहे. त्यामुळे लांजा शहरातील जास्तीतजास्त पात्र महिलांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4761811
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *