राजापूर / तुषार पाचलकर : स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाचल ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग तसेच इतर गरजू अशा एकूण ३०० नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पाचल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आणि युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १५व्या वित्त आयोगाच्या निधीचा सामाजिक उपयोग करत दिव्यांग व गरजू नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत आहे.
याच कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
१५वा वित्त आयोग निधीतून पाचलमध्ये ३०० नागरिकांना साहित्य वाटप; २७ ऑगस्टला कार्यक्रम
Leave a Comment





