राजापूर : तालुक्यातील खरवते कोष्टीवाडी येथे ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. रेवती नारायण निमणकर असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवती निमणकर या वयोवृद्ध असून त्या मागील काही काळापासून आजारी होत्या. आजारपणाला कंटाळल्याने त्या मानसिक त्रासात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या झोपलेल्या खोलीत आढळून न आल्याने नातेवाईकांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला.
शोध घेत असताना रात्री सुमारे १२.४५ वाजता घराजवळील वसंत गोविंद सावडे यांच्या मालकीच्या विहिरीत त्या उपड्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसून न आल्याने नातेवाईकांनी त्यांना विहिरीबाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून पहाटे २.५१ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती भास्कर परशुराम गुरसाळे यांनी राजापूर पोलिसांना दिली. त्यानुसार राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक ४९/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
राजापूर : खरवते कोष्टीवाडी येथे वृद्ध महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह
Leave a Comment






