राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांना उत्कृष्ट सेवा पदक

Gramin Varta
205 Views

तुषार पाचलकर/ राजापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांना जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट सेवा आणि अतिउत्कृष्ट सेवा पदकांमध्ये राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांकडून अमित यादव यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस सेवेत कर्तव्यनिष्ठा, शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रभावी प्रयत्न, गुन्हेगारीविरोधात केलेल्या कारवाया तसेच नागरिकांशी संवेदनशीलतेने आणि माणुसकीच्या भावनेतून संवाद साधण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना कायद्याची अंमलबजावणी आणि नागरिकांचा विश्वास यांचा समतोल राखण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या पदकामुळे राजापूर पोलिस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अमित यादव यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याची माहिती समोर येताच राजापूर शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Total Visitors :
4705682
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *