राजापूर : शहरातील कोंढेतड परिसरात गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) रात्री बिबट्याने रहाटे यांच्या घराशेजारी असलेल्या पारडूवर हल्ला करून त्याला ठार केले.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच अजीम जैतापकर यांनी पुन्हा वन विभागाशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर वन विभागाने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जैतापकर यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार
Leave a Comment





